नमस्कार,
गेली दोन वर्षे आपण, आपली मुले एका वेगळ्याच दुनियेचा भाग झालो आहोत. आधीही ही दुनिया आपल्या आजूबाजूला होती, पण ती आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली नव्हती. आता मात्र ती आपल्या विश्वातील अविभाज्य गोष्ट झाली आहे, कोणती आहे ही दुनिया?? तर ही मायावी दुनिया आहे नेटची, ऑनलाईनची, स्क्रीन नावाची. जोपर्यंत ही मायावी दुनिया आपल्या नियंत्रणात होती तोपर्यंत फार काही बिघडले नव्हते. पण covid नावाच्या लाटेने ही दुनिया सुनामी सारखी आपल्या आयुष्यात शिरली. आता covid ओसरल्यावर तिचे परिणाम आपल्याला जाणवत आहेत. लहान मोठे सगळेच या लाटेत वाहून गेलेले आपल्याला जाणवत आहेत. आपले काम, आपल्या मुलांचा अभ्यास, खेळ, त्यांच्या संकल्पना सगळेच त्यामुळे प्रभावित झाले आहेत.
गेल्या दोन वर्षात मुलांच्या समस्या हाताळताना, असे लक्षात आले की प्रत्येक मुलांच्या समस्येत हा screen time problem डोकावतो आहेच. मोठ्या माणसांच्या जगातही याचा व्यत्यय होतो आहे. मग यावर उपाय काय? याचे उत्तर देण्याचा प्रयत्न म्हणून प्रज्ञा मानस संशोधिका घेऊन येत आहे एक खास उपक्रम – ‘आम्ही, मुले आणि आमचा screen time ‘ एक अशी कार्यशाळा जी पालक आणि मुले दोघांच्याही समस्येवर उपाय देण्याचा प्रयत्न करेल. कार्यशाळेचे तपशील खालील पोस्टर मध्ये दिलेले आहेत. इच्छुक पालक आणि विद्यार्थ्यांनी अवश्य संपर्क साधावा.