प्रज्ञा मानस संशोधिकेच्या तर्फे दि. २ ते ६ फेब्रुवारी २०२१( सौर .......१९४२ ) पाच दिवस संशोधन पद्धती कार्यशाळा रोज २ ते ५ या वेळेत प्रत्यक्ष घेण्यात आली.
कार्यशाळा मुख्यतः ज्ञान प्रबोधिनीतील विविध विभाग व विविध केंद्रावर चालू कामातील संशोधन पुढे नेण्याच्या हेतूने योजली होती. कार्यशाळेला शैक्षणिक उपक्रम संशोधिका, सामाजिक शास्त्र संशोधिका, युवक विभाग, प्रज्ञा मानस संशोधिका, संवादिनी तसेच निगडी केंद्रातील सदस्य व अन्य असे एकूण २६ सदस्य सहभागी झाले होते. संशोधन प्रक्रियेचे स्वरूप व टप्पे, संशोधनाचे प्रकार, संशोधन आराखडे, प्रदत्त संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची ओळख व अभ्यासासाठी निवडलेल्या विषयानुसार चर्चा झाली. मा. सुजलाताई, वनिताताई, अनघाताई, सुचारिताताई, साविताताई, प्रणीताताई, तसेच मीनाक्षीताई गोखले यांनी मार्गदर्शन केले. महिन्यातून एकदा सर्व सदस्यांची आढावा बैठक त्या त्या गटप्रमुखांसोबत होईल.